Uncategorized
धारगळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दाजी शिरोडकर यांची बिनविरोध निवड

धारगळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दाजी शिरोडकर यांची बिनविरोध निवड
पेडणे:- धारगळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आज झालेल्या पंचायत मंडळाच्या बैठकीत दाजी शिरोडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड एकमताने झाली असून, शिरोडकर यांचे नाव दिलीप वीर यांनी सुचविले आणि त्याला दीप्तीशा नारोजी यांनी अनुमोदन दिले.
या बैठकीस पंचायत सदस्य सतीश धुमाळ, प्रीती कांदोळकर, अर्जुन कांदोळकर, अनिकेत साळगावकर, दिलीप वीर उपस्थित होते. निवड प्रक्रिया निरीक्षक म्हणून पेडणे गटविकास कार्यालयातील अधिकारी भिवा ठाकूर यांनी पार पाडली.
दाजी शिरोडकर यांच्या सरपंचपदी निवडीनंतर उपस्थित पंच सदस्य व हितचिंतकांनी त्यांना पुष्पगुच्छ देत हार्दिक अभिनंदन केले.
या पदासाठी सतीश धुमाळ यांनी अंतर्गत करारानुसार दुसऱ्या सदस्याला संधी देण्यासाठी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते