भाजपचे अपयश झाकण्याचा शेवटचा प्रयत्न – गिरीराज पै वेर्णेकर यांच्या द्वेष निर्माण करणाऱ्या कथा….
भाजपचे अपयश झाकण्याचा शेवटचा प्रयत्न – गिरीराज पै वेर्णेकर यांच्या द्वेष निर्माण करणाऱ्या कथा….
पणजी : भाजपच्या प्रचंड अपयशावरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी गिरीराज यांनी खोट्या, द्वेषाने भरलेल्या कथांचा आसरा घेतला आहे. हे त्यांच्या गोंधळलेल्या मनोवृत्तीचेच नव्हे तर भाजपच्या राजकीय दिवाळखोरीचे जिवंत उदाहरण आहे.
माहितीशून्य असलेले गिरीराज आता आमच्या नेत्यांवर टीका करत आहेत, पण त्यांनी निदान थोडा तरी गृहपाठ करायला हवा होता. काँग्रेस पक्षाने दिलेले स्पष्ट आणि एकत्रित आवाहन – “हा पक्षीय राजकारणाचा काळ नाही” – त्यांनी वाचायला हवे. पण भाजपच्या प्रवक्त्यांकडून सामान्य समज किंवा राष्ट्रहिताची अपेक्षा ठेवणेच चुकीचे आहे.
रायकर आणि त्यांचे भाजप आयटी सेलमधील मालक यांना आम्ही आठवण करून देतो की, पहलगाम हल्ल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर कसे राजकारण केले होते ते त्यांनी आठवावे. रायकर जर इतकेच गोंधळलेले असतील, तर भाजप आयटी सेलने त्यांना नेहमीप्रमाणे तयार भाष्ये देऊन मदत करावी.
गोवा आणि देशातील जनतेला सर्व काही समजते. हे खोटारडे नाट्य त्यांना चांगलेच कळते. भाजप गोंधळलेला आहे, कोपऱ्यात ढकलला गेला आहे आणि उघडा पडलेला आहे. म्हणूनच ते प्रत्येक मुद्यावर राजकारण करत आहेत, त्यांच्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी.
काँग्रेस पक्ष जनता आणि त्यांच्या प्रश्नांसोबत उभा आहे – अशा फोडाफोडीच्या शक्तींसोबत नाही, ज्या देशाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप आणि त्यांचे चेले कितीही खोटे प्रचार करोत, काँग्रेस पक्ष सत्य, न्याय आणि जनतेच्या हितासाठी लढत राहणार आहे.