अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया, गोवा तर्फे निराधार महिलांना मदतीचा हात

अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया, गोवा तर्फे निराधार महिलांना मदतीचा हात
हणजुण :- अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया, गोवा राज्य शाखेच्या वतीने हणजुण-आसगाव येथील गोमंतक लोकसेवा ट्रस्टच्या महिला आश्रमाला फळे, कपडे आणि इतर आवश्यक वस्तू वाटप करण्यात आल्या.
या कार्यक्रमाला फाउंडेशनचे संचालक संजय विरनोडकर तसेच सदस्य तुषार शिरोडकर, पांडुरंग कुंभार, तुकाराम शेटगावकर, मनोज आरोलकर, नूतन आसोलकर, सदिच्छा मांद्रेकर, धनराज मांद्रेकर, अनिता वेंगुर्लेकर, प्रेमनाथ डेगवेकर आणि भारत बेतकेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महिला आश्रमाच्या अध्यक्षा प्रतिमा गोवेकर यांच्या स्वागताने झाली. यावेळी त्रिता पांडुरंग बाणवलीकर, सच्चिराम मंगेश नार्वेकर, व्यवस्थापक संजय शेटये आणि निष्का हळदणकर उपस्थित होते.
संजय विरनोडकर यांनी अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमात महिलांना फळे, कपडे आणि विविध उपयुक्त वस्तू वाटप करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी निष्का निलेश हळदणकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
गोमंतक लोकसेवा ट्रस्ट या महिला आश्रमाची स्थापना 1989 साली झाली असून, गेल्या 14 वर्षांपासून हा आश्रम एका घरामध्ये कार्यरत आहे. येथे निराधार महिलांना निवारा देण्यात येतो आणि त्यांना विविध व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. या माध्यमातून त्या महिलांना स्वावलंबी बनवण्याचे कार्य केले जाते.