उच्चशिक्षितांपासून अगदी सामान्य व्यक्तीही आमिषांच्या जाळ्यात
कोणतीही शहानिशा न करता अनोळखी व्यक्तीवर विश्वास

शहरबात (कायदा-सुव्यवस्थेची) : आभासी आमिषांचे बळी
उच्चशिक्षितांपासून अगदी सामान्य व्यक्तीही आमिषांच्या जाळ्यात…..
शब्द मिडिया :- आभासी विश्वात अनोळखी व्यक्तीवर सहज विश्वास ठेवणे हे किती धोकादायक आहे, याची प्रचिती दररोज येत असते. शेअर बाजारातील गरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. पोलिसांनी वेळोवेळी आवाहन करूनही उच्चशिक्षितांपासून अगदी सामान्य व्यक्तीहीn आमिषांच्या जाळ्यात सापडत आहेत. फसवणुकीचेप्रकार सुरूच आहेत. दररोज अशा प्रकारचे किमान दोन ते तीन गुन्हे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल होतात. या आभासी विश्वातील फसवणूक रोखण्याचे आव्हान एकटे पोलीस पेलू शकणार नाहीत. त्यासाठी सामान्यांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.
कमी श्रमात झटपट पैसे कमाविण्यासाठी अनेक जण धडपडतात. शेअर बाजारात गुंतवणूक हा झटपट पैसे कमाविण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी त्यातील जोखीम जाणून घेणे आवश्यक असते. गुंतवणूक केल्यानंतर ‘सबुरी’चा सल्ला या क्षेत्रातील तज्ज्ञ देतात. ‘शेअर बाजारातील गुंतवणूक’ या विषयावर वर्गही आयोजित केले जातात. असे असताना अनेक जण समाज माध्यमातून अनाेळखी व्यक्तीकडून पाठविण्यात येणाऱ्या संदेशांवर डोळेझाक करून विश्वास ठेवतात. अगदी बाजारात भाजीपाला खरेदी करायला गेल्यानंतर निवडून, पारखून भाजी खरेदी करणारी व्यक्ती आभासी विश्वातील अनोळखी व्यक्तीवर सहज विश्वास ठेवते. हाच विश्वास फसवणुकीच्या गुन्ह्यात पहिली पायरी ठरते.
कोणतीही शहानिशा न करता अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला जातो. चोरट्यांचे समाज माध्यमातील खात्यावर सुटाबुटातील छायाचित्र असते. या छायाचित्राला भुलून अनेक जण त्याच्या संपर्कात येतात. त्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून शेअर बाजारातील गुंतवणूक योजनांची माहिती घेतली जाते. सायबर चोरट्यांच्या खात्यावर सुरुवातीला किरकोळ रक्कम पाठविली जाते. चोरटेही त्यांना किरकोळ रकमेवर अपेक्षेपेक्षा जास्त परतावा देऊन जाळ्यात ओढतात. एकदा का परतावा मिळाला, की हाव वाढते. हीच लालसा आयुष्यभर कमावलेली पुंजी एका झटक्यात घालवू शकते. काही जण तरीही कर्जबाजारी होऊन गुंतवणूक करतात.
जाळ्यात सापडत आहेत. फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत. दररोज अशा प्रकारचे किमान दोन ते तीन गुन्हे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल होतात. या आभासी विश्वातील फसवणूक रोखण्याचे आव्हान एकटे पोलीस पेलू शकणार नाहीत. त्यासाठी सामान्यांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.