Uncategorized

त्या’ संशयिताचा जामीन फेटाळला; पुढील सुनावणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर

पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतरच होणार .

‘त्या’ संशयिताचा जामीन फेटाळला; पुढील सुनावणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर

बेळगावः- फोंडाचे माजी ऑमदार लवू मामलेदार यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांच्या अटकेत असलेल्या संशयित आमीर सोहेल शकिलसाब सनदी याचा जामीन अर्ज बेळगाव न्यायालयाने फेटाळला असून पुढील सुनावणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतरच होणार आहे.माजी आमदार लवू मामलेदार खासगी कामानिमित्त खडेबाजार-बेळगाव येथील शिवानंद लॉजमध्ये वास्तव्यास होते. १५ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास प्रवास करत असताना त्यांच्या कारचा धक्का समोरच्या रिक्षाला बसला. त्यात रिक्षाचे मोठेसे नुकसान झाले नव्हते. त्यामुळे मामलेदार यांनी माफी मागत लॉजचा रस्ता धरला. पण, संबंधित रिक्षाचालकाने मात्र त्यांचा पाठलाग सुरू केला.मामलेदार शिवानंद लॉजच्या पार्किंग परिसरात कार पार्क करत असताना रिक्षाचालकाने तेथे पोहोचून मामलेदार यांच्याशी हुज्जत घालत संशयित अमिरसुहेल सनदी याने मामलेदार यांना मारहाण केली. लॉज मालकासह इतर काहीजणांकडून सनदीला अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, तरीही त्याने मारहाण सुरूच ठेवली. या प्रकारानंतर स्वतःला सावरत मामलेदार लॉजचा जिना चढून आपल्या खोलीत जाण्यासाठी निघाले असतानाच ते कोसळले. त्यानंतर लॉज व्यवस्थापनाने उपचारासाठी त्यांना तत्काळ इस्पितळात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाची माहिती मिळताच खडेबाजार पोलिसांनी तपासचक्रे गतिमान केली. मामलेदार यांना मारहाण करत त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सनदी याला ताब्यात त्याच्या विरुद्ध बेळगाव मार्केट परिसरात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), १२६ (२), १५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button