Uncategorized
श्यामाप्रसाद इनडोर स्टेडियम १० वर्षांकरिता पीपीपी तत्त्वावर.
होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक महाविद्यालयाला अनुदान

श्यामाप्रसाद इनडोर स्टेडियम १० वर्षांकरिता पीपीपी तत्त्वावर.
पणजी : राज्यात खेळाच्या प्रसार प्रचारासाठी आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी बनवलेल्या आणि क्रीडा खाते अंतर्गत येत असलेल्या ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद इनडोर स्टेडियम १० वर्षांकरिता पीपीपी तत्त्वावर चालवण्यास देण्यास आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
डॉ. सावंत म्हणाले, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर विविध प्रकारचे खेळ आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तरीही बऱ्याच वेळेला हे स्टेडियम मोकळे राहते. याकरिता पीपीपी तत्त्वावर डोम इंटरटेंमेंट प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी संस्थेला प्रति महिना २५.२५ लाख रुपयांना हे स्टेडियम चालवण्यास देण्याकरता मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली आहे. सरकारी कार्यक्रमाना स्टेडियम मोफत मिळेल.
वीज खात्याची ७.५ लाख मीटर बदलणार
वीज स्मार्ट पॉवर मीटर बसविण्यासाठी डिजी स्मार्ट नेटवर्क्स प्रायव्हेट लिमिटेडची नियुक्ती करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता दिली असून पहिल्या टप्प्यात फक्त व्यावसायिक आस्थापनाची मीटर बदलण्याचे काम हाती घेतली जाणार आहे. एकूण ७.५ लाख मीटर बदलले जातील.
होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक महाविद्यालयाला अनुदान
शिरोडा येथील श्री कामाक्षीदेवी होमिओपॅथिक महाविद्यालय आणि गोमंतक आयुर्वेदिक महाविद्यालय या खाजगी महाविद्यालयांना यापुढे सरकारी अनुदान देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले असून त्याला आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.