रेल्वे सेवा वाहतूक विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रयत्नशील
पेडणे ते काणकोण दरम्यानची रेल्वे वाहतूक वेगवान

रेल्वे सेवा वाहतूक विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रयत्नशील
पणजी : राज्यातील रस्तेवाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी रेल्वे सेवा वाहतूक विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रयत्नशील आहेत. यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांची भेट घेऊन याबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली.
याबाबत बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले राज्यातील रेल्वे वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि वेगवान झाल्यास त्याचा लाभ स्थानिक प्रवाशांना होणार आहे. यासाठीच पेडणे ते काणकोण दरम्यानची रेल्वे वाहतूक वेगवान करण्यात येणार आहे. याचा आठ तालुक्यातील प्रवाशांना लाभ होऊ शकतो. याशिवाय मडगाव रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण आणि अध्यायवतीकरण करण्यात येणार असून, ते पीपीपी तत्त्वावर करण्यात येईल, त्याचा उपयोग रेल्वे
प्रशासनासह राज्यातील प्रवाशांना होईल. याशिवाय मये रेल्वे स्थानकाची निर्मिती आणि विकास करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून याला केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी अनुकूलता
दाखवली आहे. राज्यात अन्य चार रेल्वे क्रॉसिंगची सुविधा उभारण्यात येणार आहे. ज्याचा फायदा इतर रेल्वे वाहतूक सुरळीत आणि वेगवान होण्यासाठी होईल.