राज्यात शिमगोतस्वाची धून.. साडेसातशे पोलीस तैनात करणार
४० हून अधिक चित्ररथ सहभागी होणार

राज्यात शिमगोतस्वाची धून.. साडेसातशे पोलीस तैनात करणार
पणजी :- राज्यात शिगमोत्सव सुरू असून २२ मार्च रोजी राजधानी पणजीत शिगमोत्सव साजरा होत आहे. यासाठी समितीने विशेष तयारी केली असून, हा महोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस खात्याकडून सुमारे साडेसातशे पोलीस तैनात असतील अशी माहिती पोलीस खात्याच्या वतीने देण्यात आली आहे.
राज्यातील सर्वात मोठा उत्सव म्हणून प्रसिद्ध असलेला शिगमोत्सव १५ मार्चपासून जोरात सुरू आहे. हा महोत्सव २९ मार्चपर्यंत चालणार असून राजधानी पणजीत २२ मार्चला भव्य मिरवणूक असेल. यासाठी पोलीस खात्याच्या वतीने विशेष प्रयत्न केले जात आहेत. खात्याकडून ४०० पोलीस तर साडेतीनशे वाहतूक पोलीस तैनात असतील. यंदा या महोत्सवात मोठ्या प्रमाणात रोमटामेळ पथके सहभागी होणार असून ४० हून अधिक चित्ररथ सहभागी होणार असल्याने हा महोत्सव पहाटेपर्यंत चालेल अशी शक्यता आहे.
याकरिता पोलीस खात्याच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कडक बंदोबस्त ठेवला जाणार आहे. पणजीमध्ये सध्या स्मार्ट सिटीची कामे सुरू असल्याने प्रथमच शिगमोत्सव मिरवणूक कार्निवल रस्त्याने म्हणजेच मांडवी तीरावरून जाईल.