Uncategorized

राज्य सुंदर ठेवण्यासाठी बिहारी वासियांनी योगदान द्यावे… मुख्यमंत्री

बिहारमध्ये पुन्हा एकदा डबल इंजिनचे सरकार आणावे

राज्य सुंदर ठेवण्यासाठी बिहारी वासियांनी योगदान द्यावे… मुख्यमंत्री

पणजी : परंपरा आणि शांतता प्रिय गोवा, ‘अतिथी देवो भव’ मानतो. त्यामुळे गोव्यातील संस्कृतीचे अनुसरण करून राज्याला पर्यावरणाचे रक्षणासह स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी बिहारी वासियांनी योगदान द्यावे असे आवाहन, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. इन्स्टिट्यूट मेनेझिस ब्रागांझामध्ये बिहार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री संजय शेठ, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे त्यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात सौम्या कुमार, व्ही. के. झा, स्वनंदन लाल, अविनाश सिंग, नेहा सिन्हा, डॉ. लक्षकुमार कुमार झा, रीना किशोर, नमिता शरण आदींचा सन्मान करण्यात आला.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी संकल्पनेतून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ सकल्पना साकारले जात आहे. यातून दोन राज्यांमधील कला, संस्कृती आणि इतर बाबीची देवाणघेवाण व्हावी हा मागील हेतू आहे. देशाच्या एकूणच जडणघडणीमध्ये बिहारी बांधवांचे योगदान मोठे आहे. यासाठी बिहारमध्ये पुन्हा एकदा डबल इंजिनचे सरकार आणावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button