पणजी भाजप मंडळाच्या अध्यक्षपदी पुंडलिक शेट्ये
पणजी : पणजी भाजप मंडळाच्या अध्यक्षपदी पुंडलिक शेट्ये यांची निवड करण्यात आली आहे. आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. बुधवारी मोन्सेरात यांच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नवीन समितीच्या नावांची घोषणा करण्यात आली. यावेळी प्रेमानंद म्हांबरे, नूतन अध्यक्ष पुंडलिक शेट्ये, उपमहापौर संजीव नाईक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणी : उपाध्यक्ष : शांताराम नाईक, देवानंद माईणकर, न्यासा कुतिन्हो, सरचिटणीस : संजिव नाईक, मांगिरीश उसकईकर, सचिवः बेंटो लॉरेन्स, प्रवीण कारेकर, विश्वास कुट्टीकर, खजिनदारः क्षमा फर्नांडिस, तर सदस्य म्हणून प्रभव कामत, दिपक पवार, विठ्ठल चोपडेकर, गुरुपार गर्चा, बन्सी सुर्लीकर, सर्वेश शेट्ये, मिलिंद शिरोडकर, महेंद्र नाईक, प्रणिता तळकर, अफसाना संगोली, मनीषा मणेरकर, प्रांजल नाईक, सांद्रा डीकुन्हा, शुभदा शिरगावकर, रिमा शेट्ये, आदिती चोपडेकर, योगिता पुजारी, चंद्रेश फडते, माया कोणकोणकर व अक्षय च्यारी यांचा समावेश आहे.