नियमाचे उल्लंघन करणाऱ्या खाजगी कंपन्यांनावर दंडात्मक कारवाई… मुख्यमंत्री
रोजगार विनिमय केंद्राशी संपर्क साधून त्यासंबंधीची जाहिरात देणे अनिवार्य

नियमाचे उल्लंघन करणाऱ्या खाजगी कंपन्यांनावर दंडात्मक कारवाई… मुख्यमंत्री
शब्द मीडिया :- राज्यातील उद्योगांमध्ये नोकर भरती करताना सरकारच्या रोजगार विनिमय केंद्राशी संपर्क साधून त्यासंबंधीची जाहिरात राज्यात देणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या खाजगी कंपन्यांनावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्रों पुढे म्हणाले, राज्यात नोकर भरती करताना स्थानिक तरुणांना प्रोत्साहन आणि प्राधान्य मिळावे यासाठीच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. याकरता राज्यातील सर्व खाजगी आस्थापनांना नोकर भरती करताना त्याची जाहिरात राज्यात करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे न केल्यास 10 ते 30 हजारापर्यंत दंड आहे. याशिवाय पशुसंवर्धन खात्यात २४ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील.
सेंट फ्रान्सिस झेव्हॉयर शव प्रदर्शनासाठी आलेल्या ५ कोटीच्या अभिकच्या खर्चाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. तर म्हापसा अर्बन बँकेची नंदादीप इमारत सरकार २५ कोटी रुपये खर्जुन विकत घेणार असून ठेवीदारांना त्यांचे पैसे देण्यासाठी सरकारचा प्रयत्न असेल. तपोभूमीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या आध्यात्मिक महोत्सवासाठी राज्य सरकारकडून दीड कोटी रुपयांची विशेष मदत देण्यात येईल, त्यालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
अनुदानित शाळांद्वारे विद्यार्थ्यांकडून पैसे आकारण्यात येत असल्याची सध्या तरी कोणतीही तक्रार नाही. याबाबत लेखी तक्रार आल्यास अशा शाळांवर कडक कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
श्री देव खाप्रेश्वर मंदिर उभारणार
: श्री देव खापरेश्वर मंदिरअन्य जागेत बांधले जाईल याची कल्पना देऊनच यापूर्वी संमती घेतली होती. जुन्या समितीला नवी जागा सुचवण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी शेवटपर्यंत जागा सुचवली नाही. नवी समिती प्रसाद घेऊन जागा ठरवणार आहे. या जागेतच भव्य मंदिर बांधले जाईल. येथे वडाचे नवीन झाड लावण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.