Uncategorized

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची पर्यटन विकासावर चर्चा करण्यासाठी हॉटेल असोसिएशन ऑफ इंडि्यासोबत बैठक 

पर्यटनाची वाढ व विकासाशी संबंधित विस्तृत मुद्दयांवर चर्चा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची पर्यटन विकासावर चर्चा करण्यासाठी हॉटेल असोसिएशन ऑफ इंडि्यासोबत बैठक

शब्द मीडिया :- भारतीय आतिथ्यशीलता (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्रातील राष्ट्रीय शिखर संघटना हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाने (एचएआय) राज्यांमधील व्याप्ती वाढवण्याचा एक भाग म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री माननीय डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली.

गोव्यातील पर्यटनासंदर्भातील, विशेषतः हॉटेल्सशी थेट संबंध असलेल्या मुद्दयांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक झाली. एचएआयचे अध्यक्ष श्री. के. बी. कचरू यांनी मानद खजिनदार तसेच आणि एचए‌आयच्या गोवा राज्य शाखेचे चेअरपर्सन डॉ. संजय सेठी, महासचिव श्री. एम. पी. बेझबारुआ आणि अल्कन व्हिक्टर समूहाचे संचालक श्री. विनय अल्बुकर्क यांच्यासह माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भागातील पर्यटनाची वाढ व विकासाशी संबंधित विस्तृत मुद्दयांवर यावेळी चर्चा झाली.

यात, पायाभूत सुविधांचा विकास, धोरणात्मक सहाय्य व कौशल्य विकास आदी मुद्दयांचा समावेश होता.पर्यटनाची संपूर्ण संभाव्यता खुली करण्याच्या दृष्टीने, सार्वजनिक व खासगी क्षेत्रांच्या महत्वपूर्ण सहयोगाचे आणि सरकार व उद्योगक्षेत्र यांच्या प्रतिनिधींमधील नियमित व पद्धतशीर संवादाचे, एचएआयने सातत्याने समर्थन केले आहे. विशेषतः रोजगार निर्मितीतील हॉस्पिटेलिटीचे योगदान, समावेशक वाढीला चालना देणे व प्रदेशाचा एकंदर विकास यांसाठी हे आवश्यक असल्याची एचएआयची भूमिका आहे.

यूएनडब्ल्यूटीओने विकसित केलेला आणि जी-२० शिखर परिषदेत मांडलेला गोव्यातील पर्यटनाचा आराखडा ही या क्षेत्राच्या शाश्वत विकासाची योजना आहे. एचएआय सदस्य पर्यटनाच्या शाश्वत विकासाप्रती बांधील आहेत. तसेच या क्षेत्राचे बळ वाढवण्यासाठी आणि मौजमजा व व्यवसाय या दोन्ही दृष्टींनी अव्वल दर्जाचे स्थळ म्हणून गोव्याचे महत्त्व कायम राखण्यासाठी राज्य सरकारसोबत काम करण्याची संधी मिळाल्यास ते तिचे स्वागतच करतील.नॅशनल कौन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नोलॉजीच्या (एनसीएचएमसीटी) अनेक हॉटेल व्यवस्थापन संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी एचएआयचे सदस्य पुढे येत आहेत.

आयएचसीएल व एएसपीएच या एचएआयच्या संस्थापक सदस्यांनी गोव्यातील संस्थेच्या मार्गदर्शनासाठी सामंजस्य ठरावांवर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे. कौशल्य विकासाच्या क्षेत्रातील सरकारच्या आणखी काही उपक्रमांसाठी सहयोग करण्यास एचएआय आनंदाने तयार आहे.राज्य सरकारला सातत्याने सहाय्य करत राहण्याची ग्वाही दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी एचएआयचे आभार मानले आणि राज्यात पर्यटन व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रांच्या वाढीतील एचएआयने निभावलेल्या भूमिकेची प्रशंसा केली.एचएआयचे अध्यक्ष आणि रेंडिसन हॉटेस समूहाच्या दक्षिण आशिया विभागाचे चेअरमन श्री. के. बी. कचरु एचएआयच्या पर्यटन क्षेत्राबाबतच्या बांधिलकीविषयी म्हणालेः “गोवा हे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या दृष्टीने अव्वल दर्जाचे स्थळ आहे आणि या स्थळाच्या वाढीमध्ये योगदान देणे एचएआयसाठी अभिमानास्पद आहे.

सरकारसोबत काम करणे, धोरणात्मक सुधारणांचे समर्थन करणे, रोजगार निर्मितीला हातभार लावणेआणि कुशल प्रतिभावंतांचा विकास करणे आर्दीच्या माध्यमातून गोवा आघाडीचे पर्यटनस्थळ म्हणून जोमाने वाढत राहील असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो”एचएआयच्या गोवा राज्य शाखेचे मानद खजिनदार व चेअरपर्सन डॉ. संजय सेठी म्हणाले, “हॉस्पिटेलिटी क्षेत्र या प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक परिसंस्थेचा महत्त्वपूर्ण भाग राहावा याची खातरजमा करण्यासाठी एचएआय राज्य शाखा सरकारसोबत आणि स्थानिक समुदायांसोबत घट्ट जोडलेली राहीलया वेळी महासचिव एमपी बेझबारुआ यांनी आपले विचार मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button