जागतिक महिला दिनीच एका पोलिस कर्मचाऱ्याने तरुणीवर केला बलात्कार..रक्षकच बनला भक्षक
रक्षकच भक्षक बनला तर विश्वास कोणावर ठेवायचा अशी चर्चा सुरु आहे.

जागतिक महिला दिनीच एका पोलिस कर्मचाऱ्याने तरुणीवर केला बलात्कार…
बीड :- जागतिक महिला दिनीच एका पोलिस कर्मचाऱ्याने तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक . पीडितेच्या तक्रारीवरुन आरोपीला ताब्यात घेण्यात आले. तर पीडितेला वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. ही घटना बीडमधील पाटोद्यात घडली. पुढील तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मिळालेल्या माहितीनुसार, पाटोदा पोलीस ठाण्याचे अमलदार गडकर यांनी महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी एका महिलेला बोलावले आणि पाटोदा स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही बसने महिला पुण्याहून बीडला येत होती. तिला बसमधून उतवरुन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.
गेवराई तालुक्यातील पीडित महिला काही कारणास्तव पाटोदा पोलीस ठाण्यात येत होती. त्याच दरम्यान ती अमलदार उद्धव गडकर यांच्या संपर्कात आली. त्यांच्यात फोन नंबरची देवाणघेवाण झाली. संधीचा फायदा घेत आरोपीने महिलेला पाटोदा येथे बोलावून घेतले. स्टेट बँकेच्या बाजूला घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला. महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. पण चोरीचा खोटा गुन्हा दाखल करेन अशी धमकी देत आरोपीने तिला गप्प करत बलात्कार केला.
पीडित महिलेने ही घटना दुपारी १ च्या सुमारास घडल्याचे पोलिसांना सांगितले. पाटोदा पोलीस स्टेशनममध्ये येऊन महिलेने पोलीस निरीक्षक यांच्या समोर तक्रार दाखल केली. कारवाईला सुरुवात होईपर्यंत ती पोलीस ठाण्यात बसून होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. तसेच अमलदार उद्धव गडकर या पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा क्र 77/25 भा.द.वी 64/2 -A(1)गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरण ताजे असतानाच एका पोलिसानेच जागतिक महिला दिनी तरुणीवर बलात्कार केल्याने रक्षकच भक्षक बनला तर विश्वास कोणावर ठेवायचा अशी चर्चा सुरु आहे.