Uncategorized
गोवा सरकारची…गोवाऑनलाइन सेवा व्हॉट्सएपसोबत
सरकारी कागदपत्रे, दाखले, बिल, पेमेंट पावत्या आणि सूचना सहज उपलब्ध

गोवा सरकारची…गोवाऑनलाइन सेवा व्हॉट्सएपसोबत
पणजीः गोवा सरकार आता आपली गोवाऑनलाइन सेवा व्हॉट्सएपसोबत एकत्र करून नागरिकांना अधिक सोयीस्कर बनवित आहे. माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स खात्याच्या नेतृत्वाखालील या उपक्रमामुळे रहिवाशांना सरकारी कागदपत्रे, दाखले, बिल, पेमेंट पावत्या आणि सूचना सहज उपलब्ध होणार आहेत.
गोवाऑनलाइन, हे वेब-आधारित माध्यम, २०१७ मध्ये स्व. डॉ.मनोहर पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व आयटी मंत्री श्री रोहन ए. खंवटे, यांच्या सक्रिय पाठिंब्याने सुरू करण्यात आले होते. हे ऑनलाइन माध्यम सर्व नागरिकांसाठी विशेषतः महामारीच्या काळात वरदान ठरले होते. नवीन एआय-सहाय्यित माध्यम नागरिकांना आणखी चांगला अनुभव देऊन व्हाट्सएपद्वारे २४१ यावर सरकारी सेवांमध्ये प्रवेश देईल.