Uncategorized
डॉ. तारक मंगेश आरोलकर यांचा गोमंतक भंडारी समाजातर्फे सत्कार सोहळा
आरोलकर यांच्या सामाजिक कार्याचा गौरव

- डॉ. तारक मंगेश आरोलकर यांचा गोमंतक भंडारी समाजातर्फे सत्कार सोहळा
- म्हापसा : गोमंतक भंडारी समाजाच्या वतीने डॉ. तारक मंगेश आरोलकर (समाजसेवक व नगरसेवक, म्हापसा नगरपालिका) यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा शनिवार, दि. २९ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता प्रगती संकुल, म्हापसा-गोवा येथे संपन्न होणार आहे.
- डॉ. आरोलकर यांनी समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत गोमंतक भंडारी समाजाने त्यांच्या सन्मानार्थ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. भंडारी समाजातील उभरत्या नेतृत्वाला प्रेरणा मिळावी आणि समाजातील दिग्गज व्यक्तींना उचित सन्मान मिळावा, या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
- सत्कार सोहळ्याचे प्रमुख मान्यवर अतिथी म्हणून :
- मा. श्री. रवि सिताराम नाईक (कृषी मंत्री व माजी मुख्यमंत्री, गोवा राज्य)
- मा. श्रीपाद येसो नाईक (केंद्रीय उर्जा राज्यमंत्री)
- मा. श्री. सुभाष अंकुश शिरोडकर (जलसंपदा मंत्री, गोवा राज्य)
- यांच्या हस्ते डॉ. तारक मंगेश आरोलकर यांना गौरविण्यात येणार आहे.
- सदर सोहळ्याला उपस्थित राहून समाजाच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, अशी विनंती गोमंतक भंडारी समाज सत्कार सोहळा समितीचे अध्यक्ष श्री. रोहिदास लक्ष्मण नाईक यांनी केली आहे.