द म्हापसा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक सरकारने पुनर्जीवीत करावी
नंदादीप बिल्डिंग २५ कोटी रुपयांना सरकारच्या ताब्यात

द म्हापसा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक सरकारने पुनर्जीवीत करावी
म्हापसा : द म्हापसा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची सध्याची मालमत्ता ८० ते १०० कोटांच्या आसपास आहे. यातून ठेवीदारांचे पैसे देणे शक्य असल्याने सरकारने या सहकारी बँकेचे पुनर्जीवन करावे असे आवाहन बँकेचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी केले आहे.
सरकारच्या को-ऑपरेटिव्ह रजिस्टरने द म्हापसा को-ऑपरेटिव्ह बँक दिवाळखोरीत जाहीर केली आहे. या बँकेची म्हापसा शहरात असलेली नंदादीप बिल्डिंग सरकारने २५ कोटी रुपयांना ताब्यात घेतली आहे. यातून
ठेवीदारांचे पैसे देण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये दिली होती. या पार्श्वभूमीवर खलप म्हणाले, बँकेची ठोक ठिकाणी सुमारे १०० कोटींची मालमत्ता आहे. यातून ठेवीदारांचे पैसे देणे शक्य आहे. या मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे दिल्यानंतर सरकारने पुढाकार घेऊन या बँकेचे पुनरुक्षीवन करावे असेही ते म्हणाले.