छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते अनावरण
सुराज्य आणण्याची जबाबदारी आहे.
छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते अनावरण
शिवोली :- छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे आदर्श आहेत. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या विचारावर आधारित सुराज्य आणण्याची आपली जबाबदारी आहे आणि आपण त्यासाठी कार्य करत आहोत असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
शिवोली येथे फाल्गुन कृष्ण तृतीयेच्या शिवजयंतीनिमित्त समर्थन संघटना गोवा आणि शिवयोद्धा संघटनेच्या सहाय्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार दिलायला लोबो मंत्री रोहन खवटे, आमदार चंद्रकांत शेटये, आमदार मायकल लोबो, आमदार रुडालफ फर्नांनडीस, आमदार प्रवीण अर्लेकर आमदार जीत आरोलकर, दीपक कळगुटकर, संघटनेचे संस्थापक निलेश वेरणेकर, संघटनेचे पदाधीकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते
संस्थापक अध्यक्ष निलेश वेरणेकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला तसेच व्यासपीठावरील मान्यवराना संघटनरच्या पदाधिकाऱ्या हस्ते स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. वेरणेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले. आज पासून या स्थळाचे नाव शिवाजी चौक असे जाहिर केले या नावाला मुख्यमंत्र्यांनीही अनुमोदन दिले.