
बांबोळी नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये तीव्र पाणीटंचाई
पणजी : गोवा सरकारच्या आरोग्य खात्याअंतर्गत येत असलेल्या आणि वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला संलग्न असलेल्या बांबोळी नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये 540 विद्यार्थी शिक्षण घेत असून याकरिता शंभरहून अधिक कर्मचारी वर्ग आहे. गेल्या महिनाभराहून अधिक काळ केवळ 20 टक्के पाणीपुरवठा होत आहे. याबाबत सरकारने योग्य ती काळजी घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी इन्स्टिट्यूट मधून होत आहे.
बांबोळी नर्सिंग इन्स्टिट्यूट सध्या पाणीटंचाईमुळे त्रस्त आहे. या ठिकाणी साधारणपणे सहाशेहून अधिक विद्यार्थी, कर्मचारी वर्ग आणि इतरांची आाहे. या इन्स्टिट्यूट करता युनिटची गरज असताना, केवळ 8 ते 10 युनिट पाणी पुरवठा होतो. तोही एक दिवस आड होतो. त्यामुळे इन्स्टिट्यूटमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. सद्या 200 विद्यार्थिनी आणि 60 विद्यार्थी पूर्णवेळ होस्टेल सुविधेचा लाभ घेतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना जास्तीच्या पाणीपुरवठ्याची गरज असते. मात्र अपूर्ण पाणीपुरवठांमुळे या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.