अक्कलकोट आणि शिर्डी देवदर्शन करून गोव्यात परतणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात..
अपघातात अंकिता अजित भोसले यांचा मृत्यू

अक्कलकोट आणि शिर्डी देवदर्शन करून गोव्यात परतणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात..
आजरा: अक्कलकोट आणि शिर्डी देवदर्शन करून गोव्यात परतणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात होऊन ती पलटी झाल्याची घटना शुक्रवारी (२८ मार्च) आजरा-आंबोली मार्गावरील सुळेरान येथे घडली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून तिघंजण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कामूर्ली शवोली येथील भोसले कुटुंब अक्कलकोट आणि शिर्डी देवदर्शन करून गोव्यात परत येत असताना त्यांच्या कारचा सुळेरान येथे अपघात झाला. या अपघातात अंकिता अजित भोसले यांचा मृत्यू झाला. तर अजित हरिश्चंद्र भोसले, आशिष अजित भोसले आणि अंकेश अजित भोसले हे तिघंजण गंभीर जखमी झाले आहेत.
पहाटे चारच्या सुमारास आजरा-आंबोली मार्गावरील सुळेरान येथे हा अपघात घडला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं कार रस्त्याशेजारी असलेल्या जाहिरात फलकाला धडकून पलटी झाली.
आज संध्याकाळी तिच्यावर स्थानिक स्मशान भूमीत तिचे अंतिम संस्कार करण्यात आले.