Uncategorized

अखेर खापरेश्वर देवस्थान व वटवृक्ष हटवला.. भक्त भाविकांची चेष्टा ? मूर्ती मंदिरेही राजकारणाच्या भोवऱ्यात..

प्रशासनाचा दावा आणि स्थानिकांचा आक्रोश

अखेर खापरेश्वर देवस्थान व वटवृक्ष हटवला.. भक्त भाविकांची चेष्टा ? मूर्ती मंदिरेही राजकारणाच्या भोवऱ्यात..

शब्द शारदा,पर्वरी: अखेर आज पहाटे खापरेश्वर देवस्थान व वटवृक्ष हलवण्यात आले. काल दिवसभर सुरू असलेला घटनाक्रम अत्यंत दुर्दैवी आणि भयानक ठरला. या संपूर्ण प्रकरणात विविध राजकीय पक्षांचे नेते वटवृक्ष वाचवण्यासाठी आले होते की केवळ आपली राजकीय प्रतिमा उंचावण्यासाठी, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. जनतेला अपेक्षा होती की हे नेते वटवृक्षाच्या रक्षणासाठी काही ठोस प्रयत्न करतील, मात्र त्यांनी केवळ सरकारवर हिंदू धर्मविरोधी असल्याचा आरोप करत टीका करण्यावर भर दिला. विशेष म्हणजे, या आंदोलनासाठी पर्यावरण प्रेमींना राजकीय पाठिंब्याची गरज असताना, हेच नेते गायब होते. आणि हे नेते आज अचानक कोठून प्रकट झाले यावरती जनतेच्या मनातील राग त्यांच्या डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसत होता.

गेल्या अनेक दिवसांपासून काही पर्यावरण प्रेमी खापरेश्वर देवस्थान आणि वटवृक्षाच्या रक्षणासाठी संघर्ष करत होते. त्यांनी सरकारकडे वारंवार विनवण्या केल्या, आंदोलने केली, मात्र त्यांना यश मिळाले नाही. विशेष म्हणजे, कालपर्यंत या मुद्द्याकडे राजकीय नेत्यांनी पाठ फिरवली होती, मात्र हा विषय सोशल मीडियावर गाजू लागल्यानंतर अनेक नेते अचानक या ठिकाणी हजर झाले. त्यामुळे त्यांचा हेतू खरोखर पर्यावरण संरक्षणाचा होता की केवळ आपल्या प्रतिमेची चमकविण्याचा होता, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.

सकाळी माध्यमांशी बोलताना संबंधित अभियंत्यांनी माहिती दिली की, “मी २५ फेब्रुवारीला कार्तिक कुंडईकर यांना फोन करून जागा दाखविण्याची विनंती केली होती, जेणेकरून खापरेश्वर देवस्थान व वटवृक्षाची पुनर्स्थापना करता येईल. दोन दिवसात सांगतो असे उत्तर दिले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी माझ्याशी कोणताही संपर्क साधला नाही.” विशेष म्हणजे, कालच्या घटनाक्रमादरम्यान कार्तिक कुंडईकर कुठेच दिसले नाहीत, याबाबत स्थानिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणावर भाष्य करताना स्पष्ट केले की, “खापरेश्वर देवस्थान व वटवृक्षाची पूर्ण पुनर्स्थापना करणे ही सरकारची जबाबदारी आहे. या प्रकरणात राजकारण करू नये,” अशी विनंतीही त्यांनी केली.

हिंदू धर्मामध्ये वटवृक्षाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही हे झाड पूजनीय मानले जाते. पूर्वजांनी निसर्गाच्या संवर्धनासाठी वटवृक्ष, पिंपळ आणि साथींगण वृक्षांची पूजा करण्याची परंपरा सुरू केली. कारण ही झाडे मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन उत्सर्जित करतात, वायुप्रदूषण रोखतात आणि अनेक पशु-पक्ष्यांना आसरा देतात. या झाडांमुळे संपूर्ण पर्यावरण संतुलित राहते, म्हणूनच आपल्या पूर्वजांनी त्यांना पूजनीय मानले आणि संरक्षणासाठी धार्मिक परंपरांमध्ये त्यांचा समावेश केला.

विकासाच्या नावाखाली अशी वृक्षतोड थांबवावी आणि पर्यावरणस्नेही उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जनतेकडून अधिक जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button