Uncategorized
आधुनिक युगात प्रत्येक महिलेने सावित्रीबाई फुलेचा आदर्श घ्यावा…. पार्वती नागवेकर यांचे जागतिक महिलादिनाच्या कार्यक्रमात प्रतिपादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना सन्मानाने जगण्याचा हक्क संविधानातून दिला
- आधुनिक युगात प्रत्येक महिलेने सावित्रीबाई फुलेचा आदर्श घ्यावा…. पार्वती नागवेकर यांचे जागतिक महिलादिनाच्या कार्यक्रमात प्रतिपादन
- म्हापसा :- महिला ही जननी असते. त्यांच्यामुळेच आपले जीवन आहे. त्या कधीच अबला नसतात. त्यांनी मनात आणल्यास घराचा स्वर्ग करु शकतात. महिलांमध्ये असामान्य अशी सकारात्मक शक्ती सामावलेली असते, असे प्रतिपादन पत्रकार संतोष गोवेकर यांनी केले. दाभोलवाडा-शापोरा महिला मंडळातर्फे आयोजित महिलादिन कार्यक्रमात ते बोलत होते.
- व्यासपीठावर महिला मंडळाच्या पार्वती नागवेकर, शापोरा बोट असोसिएशनचे अध्यक्ष बलभीम मालवणकर उपस्थित होते. निःस्वार्थ भावनेने पंचक्रोशीत कार्यरत असलेल्या निकिता मांद्रेकर व आश्विनी कवळेकर या महिलांचा तसेच शापोरा बोट असोसिएशनचे अध्यक्ष बलभीम मालवणकर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
- पार्वती नागवेकर यांनी आधुनिक युगात प्रत्येक महिलेने सावित्रीबाई फुले तसेच महात्मा फुले यांचा आदर्शबाळगून पुढे जाण्याचे आवाहन केले. डॉ. आंबेडकर यांनी महिलांना सन्मानाने जगण्याचा हक्क संविधानातून दिला असल्याचे त्यांनी सांगितले, या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला.