तुये पेट्रोल पंप जवळ चार चाकी आणि दुचाकी यांच्यामध्ये समोरासमोर टक्कर…राज पेडणेकर हा युवक जागीच ठार
वाहन चालकांना अंदाज न आल्याने समोरासमोर अपघात

तुये पेट्रोल पंप जवळ चार चाकी आणि दुचाकी यांच्यामध्ये समोरासमोर टक्कर…राज पेडणेकर हा युवक जागीच ठार
शब्द मीडिया :- तुये पेट्रोल पंप जवळ आर्टिका जीए 11,टी 16 72 आणि दुचाकी जीए- 3- 61 25 याच्यात समोरासमोर टक्कर यात दुचाकी चालक राज पेडणेकर जागीच ठार..मिळालेल्या माहिती नुसार आर्टिका जीए 11,टी 16 72 हे वाहन त्या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंप वर पेट्रोल घालण्यासाठी टर्न मारत होते. पेट्रोल पंप बंद असल्यामुळे त्यांनी टर्न घेताना विरुद्ध दिशेने तुये मार्गे पेडणे दुचाकी वाहन जीए झिरो थ्री एके 61 25 हे वाहन राज पेडणेकर चालवत होते. दोन्ही वाहनचालकांना काहीच अंदाज न आल्यामुळे समोरासमोर uजबरदस्त धक्का बसल्यामुळे दुचाकी स्वार राज पेडणेकर हा जागीच ठार होण्याची घटना घडली. राज पेडणेकर पंचवीस वर्षीय युवक मूळ बिचोली भागातील परंतु तो तुये इथला भाचा असून शिवोली येथे तो वास्तव्य करून राहत होता. सुरुवातीला काही काळ त्याने गॅरेज चालवण्याचं काम केलं होतं. त्याच्या सोबत त्यांचा एक भाऊ आणि आई आहे. भाऊ बारावी मध्ये शिक्षण घेत आहे. आणि तो परीक्षा देण्यासाठी गेला होता.
मांन्द्रे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तातडीने मांन्द्रे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. वाहन चालक सौरव गुडेकर नेमळे वेंगुर्ला या वाहन चालकाला पोलिसांनी अटक केली.