Uncategorized

श्री बोडगेश्वर देवस्थानाची निवडणूक चूरशीची

श्री देव बोडगेश्वर देवस्थानाची निवडणूक चूरशीची ठरली..

 श्री बोडगेश्वर देवस्थानची निवडणुक चूरशीची 

म्हापसा: श्री बोडगेश्वर देवस्थानच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऍड. वामन पंडित यांनी मोठा विजय मिळवत विरोधी उमेदवार आनंद भाईंडकर यांचा २६९ मतांनी पराभव केला. त्यांनी ५९८ मतांनी आघाडी घेत निर्णायक यश संपादन केले

श्री देव बोडगेश्वर संस्थानच्या ८ पदांसाठी एकूण २९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. विद्यमान समितीत अंतर्गत मतभेद झाल्याने यंदा तीन पॅनल रिंगणात उतरले, त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याची चर्चा सुरू होती आणि निकालाने हे खरे ठरले

निवडणूक जाहीर झाल्यापासून सत्ताधारी समिती बदलण्यासाठी काही अदृश्य शक्ती सक्रिय झाल्याची चर्चा महाजनांमध्ये सुरू होती. काही प्रभावशाली व्यक्तींनी या बदलामध्ये भूमिका बजावल्याचे बोलले जात आहे. विद्यमान समितीवरील नाराजी आणि केलेले आरोप यामुळे सत्तांतराला चालना मिळाल्याचे स्पष्ट दिसून आले.

 

 

श्री बोडगेश्वर देवस्थानच्या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक उलाढालीमुळे ही निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली. मागील कार्यकाळात आरोप-प्रत्यारोपांच्या छायेत गेलेल्या व्यवस्थापनामुळे यंदा मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचा निर्णय घेतला.

महाजनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – १,१९० मतदारांनी बजावला हक्क

निवडणुकीत १,४१६ मतदारांपैकी तब्बल १,१९० महाजनांनी मतदानाचा हक्क बजावला, जे एकूण ८४% मतदान ठरले. सात तास चाललेल्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर झाला.

निवडणुकीत विजयी झालेले पदाधिकारी:

अध्यक्ष: ऍड. वामन पंडित

उपाध्यक्ष: अमेय कोरगावकर

सचिव: हरिश्चंद्र गावकर

खजिनदार: श्यामसुंदर पेडणेकर

सहसचिव: कुणाल धारगळकर

उपखजिनदार: विशांत केणी

मुखत्यार: राजेंद्र पेडणेकर

उपमुखत्यार: साईनाथ राऊळ

 

  1. या निवडणुकीनंतर श्री बोडगेश्वर देवस्थानच्या आगामी कार्यकाळात कोणते बदल होतील, याकडे महाजनांचे लक्ष लागले आहे. नव्या समितीकडून पारदर्शक कारभार आणि विकासकामांवर भर दिला जाईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल असे मत व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button