पर्वरी वेल्फेअर फाउंडेशनतर्फे आयोजित जनसंपर्क यात्रा
जनसंपर्क यात्रेतून भाजपाने जनतेला दूर लोटण्याचा प्रयत्न केलाय त्यावर चर्चा

पर्वरी वेल्फेअर फाउंडेशन तर्फे जन संपर्क यात्रेला आठ मार्चपासून प्रारंभ
शब्द मिडिया, पर्वरी :- पर्वरी वेल्फेअर फाउंडेशनतर्फे आयोजित जनसंपर्क यात्रा 8 मार्च रोजी संध्याकाळी 4 वाजता श्री वेताळ मंदिरापासून सुरू होणार आहे. या यात्रेची सुरुवात चर्च तसेच वाटेतील मशिदीच्या दर्शनाने होईल. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, आमदार कार्लोस फरेरा आणि भंडारी समाज माजी अध्यक्ष संजू नाईक यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती पर्वरी वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष विकास प्रभू देसाई यांनी दिलीयवेळी बोलताना विकास प्रभू देसाई म्हणाले, “गेल्या दोन वर्षांपासून मी या मतदारसंघात कार्यरत आहे. येथे नागरिकांमध्ये आमदारांबद्दल भीतीचे वातावरण आहे, लोक मोकळेपणाने बोलण्यास घाबरत आहेत. मात्र, जनसंपर्क यात्रेच्या माध्यमातून हे भय दूर करण्याचा आमचा प्रयत्न राहील. नागरिकांच्या अडचणी ऐकून घेऊन, शक्य तेवढ्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
यावेळी विकास प्रभू देसाई यांनी नुकत्याच घडलेल्या रामा कानकोणकर घटनेचा तीव्र निषेध केला. त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर टीका करताना सांगितले की, “शिवाजी महाराजांच्या काळात रयतेवर कोणताही अन्याय झाला नाही, पण सावंत सरकारच्या कारभारात सर्वसामान्यांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना ‘शिवचरित्र’ भेट देणार असल्याचे ते म्हणाले, जेणेकरून त्यांनी ते वाचून त्यातून काहीतरी बोध घ्यावा.या यात्रेच्या उद्घाटनासाठी गिरीश चोडणकर आणि आमदार कार्लोस फरेरा यांना आमंत्रित करण्यात आले असले तरी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना निमंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष अद्याप मिटलेला नसल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसमध्ये तीन गटांमध्ये वर्चस्वासाठी चढाओढ सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसच्या गटबाजीला कोणते वळण लागते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.8 मार्चच्या या कार्यक्रमात काँग्रेसच्या अंतर्गत संघर्षाचा पुढील प्रवास कसा असेल, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.