म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्ष पदी प्रिया मिशाळ
उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी नगराध्यक्षांचे अभिनंदन

म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्ष पदी प्रिया मिशाळ
म्हापसा :-पालिकेच्या नगराध्यक्ष पदी प्रिया मिशाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. डॉ नूतन बिचोलकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. विद्यमान मंडळातील त्या चौथ्या नगराध्यक्ष बनल्या.
उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी नगराध्यक्षांचे कार्यालयात जाऊन अभिनंदन केले.मिशाळ यांचा या पदासाठी एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे बिनविरोध निवडीची घोषणा पालिकेच्या विशेष बैठकीत झाली.
उपजिल्हाधिकारी वर्षा परब निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित होत्या. मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांनी त्यांना साहाय्य केले. मिशाळ यांच्या नावाची शिफारस करणारे चार अर्ज दाखल करण्यात आले होते. छाननीनंतर सर्व अर्ज ग्राह्य धरण्यात आले होते.
त्यानंतर बिनविरोध निवडीची घोषणा परच यांनी केली.नूतन नगराध्यक्षा मिशाळ म्हणाल्या की, सर्व नगरसेवक, आमदार आणि पक्षाने दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरून काम करू, प्रश्नांची सोडवणूक करण्यावर भर असेल. सर्वांना विश्वासात घेऊन पुढे जाणार आहे. कचरा प्रश्न ही शहरातील मुख्य समस्या आहे. आपण तो सोडवण्याचा प्रयत्न करू, बाजारातील व्यापाऱ्यांचा प्रश्नही सोडवणार