महालसा नारायणी हायस्कूलला दुसरा डिजिटल स्मार्ट बोर्ड प्रदान
दानाच्या दृष्टीकोनातून विध्यार्थ्यांना मदत करण्याचा प्रयत्न

महालसा नारायणी हायस्कूलला दुसरा डिजिटल स्मार्ट बोर्ड प्रदान
शब्द मीडिया :- वासंती विठू गांवस चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने चेअरमन नेहा शैलेश गांवस यांनी वेर्णा येथील श्री महालसा नारायणी हायस्कूलला दुसरा डिजिटल स्मार्ट बोर्ड प्रदान केला. सदर प्रसंगी महालसा नारायणी हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हाळसाकांत देशपांडे, प्रार्थना पालेकर, समाजसेवक एड .शैलेश गांवस व्यासपीठावर उपस्थित होते.
गुरु म्हाळसाकांत देशपांडे एक असामान्य व्यक्तिमत्व असून त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या म्ह भल्यासाठी मागितलेली गुरुदक्षिणा आज मी दुसरा डिजिटल स्मार्ट बोर्ड त्यांना प्रदान करून करीत आहे, असे समाजसेवक एड. शैलेश गांवस यांनी सांगितले.
मुलांना ज्यादा ज्ञान दानाच्या दृष्टीकोनातून आपण दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दुसरा डिजिटल स्मार्ट बोर्ड या शाळेसाठी प्रदान असल्याचे कै. सौ. वासंती विठू गांवस चॅरिटेब ट्रस्टच्या अध्यक्ष नेहा शैलेश गांवस यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. विद्य शेळके सरांनी सूत्रसंचालन केले तर म्हाळसाका देशपांडे यांनी आभार व्यक्त केले.