जमशेदपूर एफसीने एफसी गोवाची विजयी घोडदौड रोखली – आयएसएल; होम ग्राऊंडवर ३-१ असा विजय
एफसी गोवाची विजयी घोडदौड
- जमशेदपूर एफसीने एफसी गोवाची विजयी घोडदौड रोखली – आयएसएल; होम ग्राऊंडवर ३-१ असा विजय
एफसी गोवा
जमशेदपूर, २ फेब्रुवारी : जमशेदपूर एफसीने होम ग्राउंडवर सर्वोत्तम सांघिक खेळाच्या जोरावर इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) साखळी सामन्यात रविवारी माजी विजेता एफसी गोवाला ३-१असे हरवले. त्यांच्या विजयाने पाहुण्यांची विजयी घोडदौड संपुष्टात आली. दोन गोल करणारा जॅविअर टोरोने त्यांच्या विजयाचा हीरो ठरला.
जमशेदपूर येथील जेआरडी टाटा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सवरील संडे स्पेशल सामन्यात जमशेदपूर एफसीने सर्व आघाड्यांवर एफसी गोवावर वर्चस्व राखले. मध्यंतराच्या आघाडीचा फायदा उठवत जमशेदपूर एफसीने दुसऱ्या सत्रातही वर्चस्व राखले. ६८व्या मिनिटाला जॅविअर टोरोने पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावला. पेनल्टी कॉर्नरवर अचूक हेडरने त्याने यजमानांना ३-१ असे आघाडीवर नेले. हाच गोल निर्णायक ठरला.
तत्पूर्वी, पहिल्या सत्रात दमदार खेळ करताना यजमानांनी पाहुण्यांवर २-१ अशी आघाडी घेतली. तिन्ही गोल अवघ्या १० मिनिटांच्या फरकाने झाले. ३४व्या मिनिटाला जावी हर्नांडेझच्या पासवर लझार किर्कोविकने उजव्या कॉर्नरच्या टॉपवरून गोल करताना जमशेदपूर एफसीचे खाते उघडले. त्यानंतर तीन मिनिटांनी जॅविअर टोरोने यजमानांना २-० असे आघाडीवर नेले. जमशेदपूर एफसी मध्यंतराला आघाडी कायम राखणार असे वाटत असतानाच पहिल्या सत्रातील अतिरिक्त वेळेत पहिल्याच मिनिटाला आयुष छेत्रीने ब्रिसन फर्नांडेझच्या पासवर एफसी गोवाचा पहिला गोल केला. तसेच मध्यंतराला यजमानांची आघाडी २-१ अशी कमी केली.
एफसी गोवाचा १८ सामन्यातील हा केवळ तिसरा पराभव आहे. त्यांच्या खात्यात ३३ गुण आहेत. आजच्या पराभवानंतर गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानी घसरले. दुसरीकडे, जमशेदपूर एफसीने १८व्या सामन्यातील ११व्या विजयासह दुसऱ्या स्थानी झेप घेतली. एफसी गोवा आणि त्यांच्यात केवळ एका गुणाचा फरक आहे.
निकाल – जमशेदपूर एफसी ३(लझार किर्कोविक ३४व्या मिनिटाला, जॅविअर टोरो ३७ आणि ६०व्या मिनिटाला) विजयी वि. एफसी गोवा १(आयुष छेत्री ४५+१व्या मिनिटाला