डिपार्टमेंट ऑफ ड्रिंकिंग वॉटर असे नवीन खाते तयार होणार असल्याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत घोषणा
सार्वजनिक खात्याचे विभाजन

डिपार्टमेंट ऑफ ड्रिंकिंग वॉटर असे नवीन खाते तयार होणार असल्याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत घोषणा
सार्वजनिक बांधकाम खात्यात विभाजन करण्याचे राज्य सरकारने निश्चित केले असून,डिपार्टमेंट ऑफ ड्रिंकिंग वॉटर असे नवे खाते तयार होणार आहे. यापुढे गोमंतकीय जनतेला दरदिवशी किमान चार तास पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पाणी पुरवठा खात्याकडे असेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी पर्वरी येथील कार्यक्रमात बोलताना दिली.
: एक महत्त्वपूर्ण निर्णयाद्वारे ‘पीडब्ल्यूडी’चे दोन विभाग करण्याचा प्रस्ताव २ गोवा सरकारने विचारात घेतला आहे. मात्र याविषयी अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे वृत्त ‘गोवन वार्ता’ने ११ फेब्रुवारीला प्रसिद्ध केले होते. ‘पीडब्ल्यूडी’मध्ये कामे विभागण्याचा प्रस्ताव आहे. परंतु, अद्याप त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. पण या खात्याच्या कामांची विभागणी होऊ शकते, असे मुख्यमंत्र्यांनीच त्यावेळी स्पष्ट केले होते. त्यानंतर बुधवारी पर्वरी येथील कार्यक्रमात बोलताना ‘पीडब्ल्यूडी’त विभाजन होऊन पाणी पुरवठा असे स्वतंत्र खाते असेल. गोमंतकीय जनतेला प्रत्येक दिवशी किमान चार तास पाणी पुरवण्याची नबाबदारी या खात्यावर असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गोमंतकीयांना २४ तास पाणी पुरवठा करणे शक्य नाही. परंतु, दिवसाला किमान चार तास पाणी देण्याची व्यवस्था केली जाईल, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी काहीच दिवसांपूर्वी दिली होती.
Fishing charters