डॉ. तारक आरोलकर यांना गोवा गौरव पुरस्कार २०२५ – सर्वोत्कृष्ट समाजसेवक पुरस्काराने सन्मानित
डॉ. तारक आरोलकर यांचा सत्कार
पणजी: समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यासाठी गोवा गौरव पुरस्कार २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. समाजसेवा, देशसेवा आणि निसर्गसेवा यांसारख्या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अनेक मान्यवरांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला.
डॉ. तारक आरोलकर यांना समाजसेवेतील अतुलनीय कार्याबद्दल सर्वोत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान मा.श्री. डॉ. सूफी एम. के चिश्ती (राष्ट्रीय महासचिव, भाजपा अल्पसंख्यक मोर्चा) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर गोवा टीव्ही २४ शी बोलताना डॉ. तारक आरोलकर म्हणाले,
“हा सन्मान माझा नसून संपूर्ण समाजाचा आहे. समाजातील लोकांनी मला समाजसेवेसाठी प्रेरित केले आणि त्यामुळे माझ्या जीवनात एक सकारात्मक बदल घडला. ईश्वर करो की माझ्या हातून पुढेही असेच कार्य घडो आणि समाजाच्या तसेच देशाच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर राहीन.”
गोवा गौरव पुरस्कार २०२५ च्या माध्यमातून समाजात सेवाभावी वृत्ती वाढीस लागावी आणि समाजहितासाठी अधिकाधिक लोकांनी पुढे यावे, हा मुख्य उद्देश होता. या सोहळ्यात अनेक समाजसेवक, पर्यावरण कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात आला.