
म्हापसा नगरपालिकेत बसणारा व्यक्ती कोण ? प्रशासन काय भूमिका घेणार?
म्हापसा : म्हापसा नगरपालिकेतील (Municipal Engineer Grade 2) अधिकारी कार्यालयात अनुपस्थित असताना, एक व्यक्ती फाईल्स तपासत असल्याचा व्हिडिओ नुकताच प्रसारमाध्यमांद्वारे व्हायरल झाला आहे. हा माणूस कोण आणि कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती वारंवार म्हापसा नगरपालिकेत येत असते, तसेच अकाऊंट्स ऑफिसर (AO) आणि पब्लिक इन्फर्मेशन ऑफिसर (PIO) यांच्या कार्यालयात बराच वेळ बसत असल्याचे आढळून आले. परिणामी, नागरिकांना अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते, असं काही लोक बोलत आहेत. तसेच, संबंधित व्यक्ती माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याचे काहींनी स्पष्ट केले. मात्र, जर तो फाईल्स तपासत असेल, तर त्याला या कार्यालयातील अधिकृत कागदपत्रे हाताळण्याची परवानगी कोणी दिली? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
जर नगरपालिकेत असे प्रकार घडत असतील, तर याला जबाबदार कोण? म्हापसा नगरपालिकेचे सीईओ आणि नगराध्यक्षा यांना या प्रकाराची कल्पना नसेल, तर हा विषय अत्यंत गंभीर आहे. याचा अर्थ असा होतो की नगरपालिकेच्या अंतर्गत घडणाऱ्या घटनांवर त्यांचे नियंत्रण नाही, असे स्पष्ट होते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
जनतेला त्रास होऊ नये व प्रशासनाच्या कामकाजात अडथळे येऊ नयेत, यासाठी जबाबदार अधिकारी योग्य ती कारवाई करतील, अशी अपेक्षा आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
माहिती अधिकार हा नागरिकांचा मौलिक अधिकार आहे, आणि तो जनहितासाठीच वापरण्यात यावा. मात्र, त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. जनतेच्या हितासाठी योग्य पद्धतीने कारवाई होणे शक्य आहे